Maharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर 09 सप्टेंबर 2025

मुख्यपृष्ठव्हिडीओबातम्यामहाराष्ट्रMaharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर 09 सप्टेंबर 2025

By : abp majha web team  | 09 Sep 2025 05:38 PM (IST)

मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड समोर आली आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार कृपाल तुमाने यांनी दावा केला आहे की, ठाकरेंच्या शिवसेनेतील दोन आमदार वगळता उर्वरित सर्व आमदार शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात आहेत आणि लवकरच पक्षप्रवेश करतील. बीएमसीमधील ऐंशी टक्के आमदार संपर्कात असल्याचा दावाही त्यांनी केला. यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कृपाल तुमाने यांच्यावर टीका केली. “आधी तुमच्या पक्षाचं नशीब फुटलंय ते पहा. ज्यांचा स्वतःचाच पक्ष भाजपामध्ये विलीन होतोय ते काय वक्तव्य करताहेत?” असा टोला राऊतांनी लगावला. आमदार महेश सावंत आणि माजी आमदार वैभव नाईक यांनीही कृपाल तुमाने यांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शिंदेंच्या शिवसेनेमध्ये नव्या विभागप्रमुखांच्या नियुक्तीवरून वाद निर्माण झाला आहे. पश्चिम मुंबई नगरमधील नाराज पदाधिकारी राजीनामे देण्याच्या तयारीत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी बोलावले आहे. दुसरीकडे, ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही विभागप्रमुखांना मातोश्रीवर चर्चेसाठी बोलावले आहे. संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील किमान बारा मंत्र्यांची निष्पक्ष चौकशी झाल्यास त्यांना तुरुंगात जावे लागेल असा दावा केला. नेपाळमध्ये सव्वीस ऍप्सवर बंदी घातल्यानंतर तरुणांकडून आंदोलन करण्यात आले. आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने काठमांडू विमानतळ बंद करण्यात आले. उपराष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकीत शहाण्णव टक्के मतदान झाले. बीआरएस आणि बीजेडीच्या खासदारांनी मतदानाला गैरहजर राहिल्याने इंडिया आघाडीच्या उमेदवाराला धक्का बसला.

महाराष्ट्र

Eknath Shinde : जरांगेंना शिंदेंचं कौतुक, फडणवीसांचा राग का? माझाच्या न्यूजरुममध्ये DCM एकनाथ शिंदे

आणखी पाहा

Sponsored Links by Taboola

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा

टेलिग्राम जॉईन करा

 

Author

Leave a Comment