मराठा आंदोलनकर्त्यांच्या मागणीनुसार हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेट लागू करणार अशा पद्धतीच्या बातम्या समोर येत आहेत. हे दोन्ही गॅजेट कशा पद्धतीने लागू करण्यात येणर आहेत, याबाबत सविस्तर माहिती आलेली नाही.तसेच या जीआरची अंमलबजावणी करणार काय तरतुदी असणार याबद्दल सविस्तर माहिती आमच्यापर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत आम्ही त्यावर भाष्य करणार नाही,असे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी सांगितले.
advertisement
सरकारने जो ड्राफ्ट शासन निर्णय काढण्याकरता तयार केला असेल तो ड्राफ्ट आंदोलनकर्त्यांना दाखवणार आहे.तो ड्राफ्ट आम्हाला पाठवून आमची सुद्धा संमती सरकारने घ्यावी अशी अपेक्षा, बबनराव तायवाडे यांनी व्यक्त केली आहे. तसेच यामध्ये असणाऱ्या तरतुदी समावेश केलाय, त्याने ओबीसीचा नुकसान होणार नाही हे स्पष्ट होऊ द्यावे,अशी मागणी देखील तायवाडे यांनी केली आहे.
advertisement
मराठा उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील यांच्यासोबत आलेल्या शिष्टमंडळासोबत चर्चा झाल्यानंतर मनोज जरांगे यांनी माध्यमांना सांगितले की, सरकारने हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी करण्यास मान्यता दिली आहे.सातारा संस्थानच्या गॅझेटियरमध्ये पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण बसतो. सातारा गॅझेटियर तथा पुणे आणि औंध गॅझेटियरची अंमलबजावणी करण्याच्या मुद्यावर कायदेशीर बाबी तपासून जलदगतीने निर्णय घेण्यात येईल असे सरकारने सांगितले आहे. या प्रकरणी 2-3 मुद्यांवर कायदेशीर त्रुटी आहेत.पण सरकारने त्यावरही 15 दिवसांत योग्य ती कारवाई करण्याची ग्वाही दिली आहे, असे मनोज जरांगे यांनी सांगितले.
advertisement
यावेळी शिवेंद्रराजे भोसले यांनी सातारा गॅझेट लागू करण्याची माहिती दिली. या गॅझेटसाठी आम्ही 1 महिन्याचा वेळ सरकारला द्यायला तयार आहे, अशी माहिती जरांगे यांनी दिली.
मराठा आणि कुणबी एकच असल्याच्या मुद्यावर सरकारला 2 महिन्यांची मुदत देण्याची जरांगे यांनी घोषणा केली आहे.आम्ही सरकारकडे 58 लाख नोंदींच्या आधारावर मराठा आणि कुणबी एकच असल्याचा जीआर काढण्याची मागणी केली होती. त्यावर सरकारने हा मुद्दा क्लिष्ट असल्यामुळे त्यावर निर्णय घेण्यासाठी महिन्याभराची मुदत मागितली होती. मी त्यांना दीड महिन्यांची मुदत दिली. पण विखे पाटलांचा हात थोड जड आहे. त्यांनी 2 महिन्यांचा वेळ मागितला आहे. त्यानुसार आम्ही त्यांना ही मुदत दिली आहे, असे जरांगे यांनी सांगितले.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Manoj Jarange : मनोज जरांगे जिंकले! OBC नेत्याची पहिलीच प्रतिक्रिया