मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चेदरम्यान सरकारला स्पष्ट इशारा दिला. ते म्हणाले, “जर सरकारने आमच्या मागण्या मान्य करून तातडीने जीआर काढला, तर आज रात्री 9 वाजेपर्यंत मराठा आंदोलक मुंबई सोडतील.”
जरांगे पुढे म्हणाले, “तुमच्या ताकदीमुळे आम्ही जिंकलो आहोत. मागण्या मान्य झाल्या की, सर्व मराठे आनंदाने मुंबईबाहेर पडतील. एका तासात सर्व जीआर काढून आमच्याकडे घेऊन या, त्यानंतर आम्ही अंतिम निर्णय जाहीर करू.” त्यांनी सरकारला तीन स्वतंत्र जीआर काढण्याची मागणी केली: सातारा गॅझेटियरसाठी एक, हैदराबाद गॅझेटियरसाठी दुसरा आणि इतर मागण्यांसाठी तिसरा जीआर. जर सर्व काही सुरळीत झाले, तर रात्री 9 वाजेपर्यंत मराठा आंदोलक मुंबई मोकळी करतील, असे त्यांनी ठामपणे सांगितले.