Maratha Reservation: माईकवर चर्चा होते का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मनोज जरांगे यांना सवाल

नारायण पेठेतील वर्तक बाग येथील मेट्रोच्या पादचारी पुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार हेमंत रासने, सिद्धार्थ शिरोळे, दिलीप कांबळे आदी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, प्रवासात असल्याने नेमके आंदोलनाबाबत न्यायालयाने काय म्हटले हे ऐकले नाही. आंदोलनासाठी काही अटी-शर्ती टाकून परवानगी देण्यात आली होती. न्यायालयाच्या निर्देशांचे पालन प्रशासनाला करावेच लागते आणि ते योग्यरीत्या केले जाईल. आरक्षणाची मर्यादा वाढवावी, हे कायद्याचे जाणकार सांगत नाहीत, तर शरद पवार यांनी हे विधान केले आहे.
 

Author

Leave a Comment