Maratha Reservation Protest | Mumbai रिकामी, आंदोलक परतले, ६ मागण्या मान्य

मुख्यपृष्ठव्हिडीओबातम्यामहाराष्ट्रMaratha Reservation Protest | Mumbai रिकामी, आंदोलक परतले, ६ मागण्या मान्य

By : abp majha web team  | 02 Sep 2025 11:10 PM (IST)

राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत GR काढल्यानंतर मराठा आंदोलन मागे घेण्यात आले आहे. मनोज जरांगे यांनी GR काढल्यास मुंबई रिकामी करण्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर मराठा आंदोलक आपापल्या गावाकडे परतले आहेत. गेल्या पाच दिवसांपासून Azad Maidan आणि CSMT स्थानकाबाहेर आंदोलकांची मोठी गर्दी होती. आता ही दोन्ही ठिकाणे रिकामी झाली आहेत. आंदोलकांनी संपूर्ण रस्त्यावर ताबा घेतला होता, मात्र आता वाहतूक सुरळीत झाली आहे. CSMT स्थानक, महापालिका आणि कोर्टाकडे जाणारा हा महत्त्वाचा रस्ता आता खुला झाला आहे. आंदोलकांच्या आठ मागण्यांपैकी सहा मागण्या मान्य झाल्या आहेत. त्यामुळे आंदोलकांनी गुलाल उधळून आंदोलन मागे घेतले. आंदोलक मुंबईबाहेर पडायला सुरुवात झाली आहे. यामुळे मुंबईतील वाहतूक व्यवस्था पूर्वपदावर आली आहे.

महाराष्ट्र

Manoj Jarange PC Mumbai Azad Maidan : आरक्षण लढाई जिंकलो, मनोज जरांगे यांची विजयी पत्रकार परिषद

आणखी पाहा

Sponsored Links by Taboola

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा

टेलिग्राम जॉईन करा

 

Author

Leave a Comment