MPSC Result Declared : एमपीएससी’तर्फे राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, १५१६ उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले

एमपीएससीतर्फे २७ ते २९ मे या कालावधीत राज्य सेवा मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. निकालानुसार मुलाखतीसाठी प्रथमदर्शनी पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांना त्यांच्या परीक्षेच्या अर्जातील दाव्यांच्या पृष्ठ्यर्थ मुलाखतीवेळी त्यांची पात्रता मूळ प्रमाणपत्रावरून तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून मुलाखतीस बोलावण्यात येणार आहे. उमेदवारांनी अर्जात दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळून आल्यास अथवा अर्जातील दाव्यानुसार आवश्यक मूळ प्रमाणपत्रांची पूर्तता मुलाखतीवेळी न केल्यास, तसेच अधिसूचनेतील तरतुदीनुसार दावे तपासताना व अन्य कारणामुळे अपात्र ठरणाऱ्या संबंधित उमेदवारांची उमेदवारी, कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल.
 

Author

Leave a Comment