Published by:
Last Updated:September 02, 2025 11:35 PM IST
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक नाका परिसरात दुपारी १.४५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. एका अल्पवयीन मुलाने हे कृत्य केलं आहे.
News18
लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी
नाशिक : नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या मैत्रिणीची छेड काढल्याच्या संशयातून एका विधी संघर्षित मुलाने एका भिकाऱ्याच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याची घटना घडली आहे. भिकाऱ्याची हत्या केल्यानंतर हा मुलगा मृतदेहाजवळ हातवारे करून नाचत होता. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक नाका परिसरात दुपारी १.४५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. एका अल्पवयीन मुलाने हे कृत्य केलं आहे. मृताचं वय ४५ असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं आहे.
advertisement
आरोपी अल्पवयीन बालक हा आपल्या मैत्रिणीसोबत ठक्कर बाजार जवळील एका हॉटेलजवळ उभा होता. त्यावेळी त्याची मैत्रीण पाण्याची बाटली आणण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिथे एक भिकारी बसलेला होता. त्याने या मुलीची छेड काढण्याचा संशय त्या विधीसंघर्षित बालकाला आला. त्याने तिथे जाऊन त्या भिकाऱ्याला जाब विचारला, दोघांमध्ये वाद झाला आणि त्याने रागाच्या भरात भिकाऱ्याच्या डोक्यात दगड टाकला. या घटनेत भिकाऱ्याचा मृत्यू झाला.
advertisement
एवढंच नाहीतर, भिकाऱ्याची हत्या केल्यानंतर हा अल्पवयीन मुलगा रस्त्यावर नाचत होता. स्थानिकांनी जेव्हा मोबाईलमध्ये व्हिडीओ रेकॉर्ड केला तेव्हा तो हातवारे करून नाचत होता. स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच सरकारवाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसंच फॉरेन्सिक टीम ही घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी या मुलाला ताब्यात घेतलं आहे.या भिकाऱ्याची अद्याप ओळख पटलेली नाही. भिकाऱ्याची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nashik: मैत्रिणीची छेड काढल्याचा संशय, अल्पवयीन पोराने 45 वर्षांच्या भिकाऱ्याला दगडाने ठेचून मारलं, नाशिक हादरलं