Nashik Accident News: खड्डा वाचविण्याच्या नादात रिक्षाचालकाचा अपघाती मृत्यू

याबाबत अधिक माहिती अशी की, पंचवटीतील इंद्रकुंड येथील सुनील नथु अहिरे (वय ५५) हे पत्नी, दोन मुलांसमवेत वास्तव्यास होते. उदरनिर्वाहासाठी ते रिक्षा चालवत होता. शुक्रवार (दि.२६) रोजी सुनील रिक्षा चालवत बळी मंदिरकडून मेरी – रासबिहारी लिंक रोड मार्गे आर टी ओ कॉर्नरकडे चालले होते. राजमाता मंगल कार्यालयासमोर खड्डा वाचविताना रिक्षाचा अपघात झाला. यात रिक्षा पलटी झाल्याने चालक गंभीर जखमी झाले. तेथील नागरिकांनी धाव घेत जखमीस तातडीने उपचारार्थ शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकारी यांनी त्यास तपासून मृत घोषित केले.
 

Author

Leave a Comment