Navi Mumbai Housing | 791 घरं अडकली, विकासकांनी नियमांचा चुकीचा अर्थ घेतला; समिती स्थापनेचे निर्देश

एक्स्प्लोर

मुख्यपृष्ठव्हिडीओबातम्यामहाराष्ट्रNavi Mumbai Housing | 791 घरं अडकली, विकासकांनी नियमांचा चुकीचा अर्थ घेतला; समिती स्थापनेचे निर्देश

By : abp majha web team  | 10 Sep 2025 12:14 AM (IST)

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात सातशे एक्क्याण्णव घरं अडकल्याप्रकरणी विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंनी आज दुपारी महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीत नगर विकास विभागाचे प्रधान सचिव यांनी नियमांचा चुकीचा अर्थ घेण्यात आल्याची कबुली दिली. नवी मुंबई महापालिका हद्दीत चार हजार चौरस मीटरपेक्षा मोठा भूखंड विकासकांना देण्यात आल्यास त्यांना प्रकल्पातील वीस टक्के क्षेत्रावर आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न घटकांसाठी घरं बांधून ती माडाकडे हस्तांतरित करण्याची तरतूद आहे. नवी मुंबईतील अकरा विकासकांनी सरकारी जमिनींवर इमारती बांधल्या पण वीस टक्के क्षेत्रांवरील घरं हस्तांतरित केलेली नाहीत. हा प्रश्न लक्षवेधीच्या माध्यमातून विधान परिषदेत उपस्थित करण्यात आला होता. सभापती शिंदेंनी समिती गठित करून गरीबांना त्यांच्या वाट्याची घरं कशी देण्यात येतील यावर काम करण्याचे निर्देशही दिले. भूमिराजकडून तीस, बालाजीकडून दोनशे, विजन इन्फ्राकडून दोनशे, रीजन्सीकडून शंभर, बी अँड एन बिल्डकोन्नकडून तीस आणि आलियागामीकडून पन्नास सदनिका अपेक्षित आहेत.

महाराष्ट्र

Eknath Shinde : जरांगेंना शिंदेंचं कौतुक, फडणवीसांचा राग का? माझाच्या न्यूजरुममध्ये DCM एकनाथ शिंदे

आणखी पाहा

Sponsored Links by Taboola

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा

टेलिग्राम जॉईन करा

 

Author

Leave a Comment