Navi Mumbai Land Scam | रोहित पवारांचे आरोप खोटे, बिवलकरांचा पलटवार; SIT चौकशीची मागणी

एक्स्प्लोर

मुख्यपृष्ठव्हिडीओबातम्यामहाराष्ट्रNavi Mumbai Land Scam | रोहित पवारांचे आरोप खोटे, बिवलकरांचा पलटवार; SIT चौकशीची मागणी

By : abp majha web team  | 10 Sep 2025 12:10 AM (IST)

आमदार रोहित पवारांनी नवी मुंबईतील पाच हजार कोटींच्या जमीन घोटाळ्याचे आरोप केले होते. हे आरोप खोटे असून त्यामागे राजकीय हेतू असल्याचा दावा यशवंत बिवलकर यांनी पत्रकार परिषदेत केला. अठराशे सोळा साली राघोजी आंग्रे यांनी आपल्या कुटुंबाला ही जमीन दिली होती, असे बिवलकर यांनी सांगितले. ब्रिटिशांनी इनाम रद्द केल्यावर ठाणे न्यायालय आणि लंडनच्या सुप्रीम कोर्टात केस जिंकल्याचे त्यांनी नमूद केले. सरकारकडे सर्व पुरावे असूनही अधिकार नाकारले जात असल्याचा आरोप बिवलकर यांनी केला. “माझं नाव खोट्या प्रकरणात घालण्यात येतंय, कुटुंबाची बदनामी करण्यात येतेय, अटक करायला मोगळाई लागते का?” असा प्रश्न विचारत त्यांनी संताप व्यक्त केला. दरम्यान, बिवलकरांचे वकील तन्वीर निजाम यांनी सर्व कागदपत्रांची एसआयटी चौकशी करून पवार कुटुंब आणि भूमाफियांमधील संबंध उघड करण्याची मागणी केली. रोहित पवारांनी असे बोलणे सुरू ठेवल्यास कायदेशीर कारवाई करावी लागेल, असेही बिवलकर यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र

Eknath Shinde : जरांगेंना शिंदेंचं कौतुक, फडणवीसांचा राग का? माझाच्या न्यूजरुममध्ये DCM एकनाथ शिंदे

आणखी पाहा

Sponsored Links by Taboola

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा

टेलिग्राम जॉईन करा

 

Author

Leave a Comment