मुख्यपृष्ठव्हिडीओबातम्याविश्वNepal Gen Z Protest | Sudam Gurung यांच्या आवाहनाने KP Sharma Oli सरकार हादरले
By : abp majha web team | 09 Sep 2025 07:50 PM (IST)
नेपाळमध्ये सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमध्ये सुदाम गुरुंग हे एक प्रमुख नाव आहे. छत्तीस वर्षीय युवा नेते सुदाम गुरुंग यांच्या एका आवाहनामुळे नेपाळमधील तरुणाई रस्त्यावर उतरली. ८ सप्टेंबर रोजी इन्स्टाग्रामद्वारे त्यांनी आंदोलनाचे आवाहन केले होते. या आंदोलनामुळे सरकारला मोठा धक्का बसला. गुरुंग यांनी ‘हामी नेपाळ’ या संस्थेची स्थापना केली असून, त्यांनी ‘नेपो बेबीज’ या देशातील उच्चभ्रूंना लक्ष्य केले. यामुळे युवा पिढीच्या भावनांना हात घातला गेला आणि आंदोलन तीव्र झाले. या परिस्थितीमुळे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांना पायउतार व्हावे लागले आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळणकर यांनी या परिस्थितीचे विश्लेषण केले आहे. त्यांच्या मते, “के. पी. ओली यांचं सगळ्यात मोठं फेल्यूवर आहे मला असं वाटतं इंटेलिजेंस फेल्यूवर आहे.” हे आंदोलन एकाच वेळी संघटित पद्धतीने सुरू झाले आणि टप्प्याटप्प्याने हिंसक बनले. संसदेवर, राष्ट्रपती भवनावर आणि पोलिसांवर हल्ले झाले. यामागे एक संघटित विचारप्रवाह होता, जो ओळखण्यात ओली सरकारला अपयश आले.
आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा