post office scheme for women : पत्नीच्या नावाने 1 लाख रुपये FD ठेवले तर 2 वर्षांत किती परतावा मिळेल? | मनी – News18 मराठी
Trending:
Follow Us
Published by:
Last Updated:October 02, 2025 10:40 AM IST
post office scheme for women: 100000 रुपयांची FD पत्नीच्या नावाने ठेवल्यास 730 दिवसांनंतर मिळणारा परतावा पाहून थक्क व्हाल!
तुमची बायको तुम्हाला धनवान बनवू शकते, विश्वास बसत नाही तर पोस्ट ऑफिसची ही स्कीम तुम्ही आजमावून पाहू शकता. रेपो रेटमध्ये कोणतीही कपात किंवा वाढ करण्यात आली नाही. त्यामुळे बँकांनी FD चे दरही जैसे थे ठेवले आहेत. मात्र बँकेपेक्षा पोस्ट ऑफिसमध्ये चांगले दर मिळत आहेत.
advertisement
नियमित गुंतवणूक करणे हे दीर्घकाळात चांगले आणि खात्रीशीर उत्पन्न मिळवण्याचा सोपा मार्ग आहे. आज बाजारात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध असले तरी, त्यात मोठा धोका असतो. याच कारणामुळे अनेक लोक आजही सरकारी योजना, बाँड्स किंवा बँक जमा योजनांसारख्या हमी परतावा देणाऱ्या पर्यायांना प्राधान्य देतात, कारण यातील धोका खूप कमी असतो. बँक जमा योजनांचा विचार केल्यास, डोळ्यासमोर सर्वात आधी फिक्स्ड डिपॉझिट योजनाच येतात.
advertisement
सध्या बाजारात फिक्स्ड डिपॉझिट हा एक अत्यंत लोकप्रिय गुंतवणूक पर्याय मानला जातो. सामान्यतः, बँक एफडीवर चांगली व्याजदर देतात आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी तर हे दर सामान्य लोकांपेक्षा अधिक असतात. त्यामुळे अनेक लोक आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीच्या नावावर एफडी करून अधिक लाभ घेण्याचा विचार करतात.
advertisement
नुकतीच भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये कपात केल्यामुळे, देशभरातील अनेक बँकांनी आपल्या एफडीच्या व्याजदरात कपात केली आहे. यामुळे गुंतवणूकदारांना मिळणाऱ्या परताव्यावर परिणाम झाला आहे. Post Office Time Deposit – TD गुंतवणूकदारांसाठी एक उत्तम पर्याय ठरली आहे.
advertisement
विशेष म्हणजे, आरबीआयने रेपो रेटमध्ये कपात केल्यानंतरही, टपाल कार्यालय आपल्या ग्राहकांना पूर्वीचेच उच्च व्याजदर देत आहे. रेपो रेट कपातीचा या टपाल कार्यालयाच्या योजनांवर अद्याप कोणताही परिणाम झालेला नाही. टपाल कार्यालयात तुम्ही १ ते ५ वर्षांच्या कालावधीसाठी टाइम डिपॉझिट उघडता येतं. उघडू शकता आणि बँकांच्या एफडीप्रमाणेच यातही निश्चित कालावधीसाठी खात्रीशीर उत्पन्न मिळते.
advertisement
टपाल कार्यालय आपल्या ग्राहकांना १ वर्ष, २ वर्ष, ३ वर्ष आणि ५ वर्षांसाठी टीडी खाते उघडण्याचा पर्याय देते. यावर मिळणारे व्याजदरही आकर्षक आहेत: १ वर्षाच्या टीडीवर ६.९ टक्के, २ वर्षांच्या टीडीवर ७.० टक्के, ३ वर्षांच्या टीडीवर ७.१ टक्के आणि ५ वर्षांच्या टीडीवर ७.५ टक्के व्याजदर मिळत आहे. महत्त्वाचे म्हणजे, टपाल कार्यालयाच्या या योजनांमध्ये पुरुष, महिला किंवा ज्येष्ठ नागरिक सर्वच ग्राहकांना समान व्याजदर मिळतो. यात किमान १,००० रुपये जमा करण्याची मर्यादा आहे, तर कमाल रकमेची कोणतीही मर्यादा नाही.
advertisement
याच हिशेबाने, जर एखाद्या व्यक्तीने आपल्या पत्नीच्या नावावर टपाल कार्यालयात २४ महिन्यांसाठी (२ वर्षांसाठी) १,००,००० रुपये मुदत ठेव म्हणून गुंतवले, तर मुदतपूर्तीनंतर त्याला एकूण १,१४,८८८ रुपये मिळतील. यात मूळ १ लाख रुपयांव्यतिरिक्त १४,८८८ रुपये निव्वळ व्याज म्हणून मिळतील. ही योजना कोणत्याही धोक्याशिवाय (Risk-Free) आणि निश्चित हमीसह गुंतवणूकदारांना चांगला परतावा देत आहे.
advertisement
गावात शेण गोळा करुन भरायचा पोट, आता करोडपती; 7 स्टार हॉटेलमध्ये करतो पार्ट्या
View All
पत्नीच्या नावाने 1 लाख रुपये FD ठेवले तर 2 वर्षांत किती परतावा मिळेल?
झोपताना केस बांधून की सोडून झोपावं? एक सवय ठरू शकते तुमच्या केसांसाठी हेल्दी
दिवाळी स्वच्छ्तेदरम्यान ‘या’ वस्तू काढून टाका! आयुष्यावर करतात नकारात्मक परिणाम
डार्क जीन्स धुताना करू नका ‘या’ 5 चुका; कधीच पडणार नाही जिन्सचा रंग फिका!
पश्चिम महाराष्ट्रात वारं फिरलं, पुन्हा धो धो कोसळणार, IMD कडून महत्त्वाचं अपडेट
आणखी पाहा
अतिवृष्टीमुळे सोयाबीन भुईसपाट, ऑक्टोबरमध्ये दर कडाडणार का? नवीन अपडेट काय?
KBC : रामायणाच्या ‘या’ सोप्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकली नाही सोनाक्षी सिन्हा
फ्लॅटधारकांना मोठा दिलासा! ‘हा’ ऐतिहासिक नियम लवकरच लागू होणार
झोपताना केस बांधून की सोडून झोपावं? एक सवय ठरू शकते तुमच्या केसांसाठी हेल्दी
आणखी पाहा
advertisement