Private Bus: खासगी बस चालकांचे मनमानी दर, पुणे आरटीओ अॅक्शन मोडमध्ये, कुठे करायची तक्रार? | महाराष्ट्र – News18 मराठी
Trending:
Follow Us
Published by:
Reported by:
Last Updated:September 05, 2025 1:25 PM IST
Private Bus: दसरा आणि दिवाळीच्या काळात हजारो नागरिक सणानिमित्त आपल्या गावी जातात. गावी जाण्यासाठी अनेकदा खासगी बसचा पर्याय वापरावा लागतो.
Private Bus: खासगी बस चालकांचे मनमानी दर, पुणे आरटीओ अॅक्शन मोडमध्ये, कुठे करायची तक्रार?
पुणे: सणासुदीच्या काळात शहरातून गावी जाणाऱ्यांची संख्या फास जास्त असते. एसटी आणि रेल्वेची तिकिटं मिळाली नाही तर अनेक प्रवासी खासगी बसचा पर्याय निवडतात. मात्र, काही खासगी वाहतूकदार प्रवाशांकडून मनमानी भाडे वसूल करत असल्याचा प्रकार समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर, पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) अॅक्शन मोडमध्ये आलं आहे. जास्तीचं भाडे आकारणाऱ्या खासगी बसविरोधात तक्रार करावी, असं आवाहन पुणे आरटीएने केलं आहे. प्रवाशांच्या जागृतीसाठी शहरातील प्रमुख ठिकाणी आणि खासगी बसतळावर माहितीपर फलक लावण्यात आले आहेत. नियमबाह्य पद्धतीने जास्तीचे पैसे घेतल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा आरटीओने दिला आहे.
प्रवाशांची लूट थांबवण्यासाठी आरटीओची मोहीम
नोकरी, शिक्षण, व्यवसायाच्या निमित्ताने पुण्यात राहणाऱ्या इतर जिल्ह्यांतील नागरिकांची संख्या जास्त आहे. दसरा आणि दिवाळीच्या काळात हजारो नागरिक सणानिमित्त आपल्या गावी जातात. त्यामुळे सणांच्या काळात रेल्वे गाड्या व एसटीचं बुकिंग फुल असतं. अशा वेळी गावी जाणाऱ्यांना खासगी बसशिवाय पर्याय राहत नाही. याच संधीचा फायदा घेऊन अनेक खासगी बसचालक दुप्पट तिकीटदर आकारतात. एसटी भाड्याच्या दीडपट दरापेक्षा अधिक भाडं आकारणं बेकायदेशीर आहे.
advertisement
Pune Traffic: अनंत चतुर्दशीला वाहतुकीत मोठे बदल, PMP च्या 5 स्थानकांचे स्थलांतर, कुठून सुटतील बस?
येथे करा तक्रार
जास्तीचे भाडे आकारले जात असल्यास प्रवाशांनी तत्काळ प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे तक्रार नोंदवावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. यासाठी 8275330101 हेल्पलाइन क्रमांक आणि buscomplaint.rtopune@gmail.comहा ई-मेल आयडी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तक्रार नोंदवताना प्रवाशांनी आपलं नाव, मोबाइल क्रमांक, प्रवास मार्ग, बस क्रमांक, बसचा प्रकार, बसमधील फोटो आणि तिकिटाची प्रत जोडणं आवश्यक आहे. प्राप्त झालेल्या तक्रारींवर तातडीने कारवाई करण्यात येणार आहे.
advertisement
पुण्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले म्हणाले, “सणासुदीच्या काळात खासगी बसचालकांकडून प्रवाशांची लूट होऊ नये, यासाठी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून विशेष मोहीम राबवण्यात आली आहे. प्रवाशांकडून जादा तिकीट घेतल्यास तक्रार करण्याचं आवाहन आरटीओनं केलं आहे. यासाठी हेल्पलाइन क्रमांक आणि ई-मेल आयडी असलेले फलक शहरातील खासगी बसतळांवर लावण्यात आले आहेत. प्रवाशांकडून आलेल्या तक्रारींची पडताळणी करून नियमभंग करणाऱ्या बसचालकांवर कारवाई केली जाईल.”
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Private Bus: खासगी बस चालकांचे मनमानी दर, पुणे आरटीओ अॅक्शन मोडमध्ये, कुठे करायची तक्रार?
Next Article
advertisement
जितेंद्रच्या हिरोइनचं गाणं, 40 वर्षांनंतरही ऐकून प्रत्येक आईचे हृदय तुटतं
View All
बाप्पामुळे पॅचअप! 2 वर्षांआधी डिवोर्स, सेलिब्रेटी कपल पुन्हा एकत्र,रोमँटिक फोटो
कठोर वाटण्याऱ्या जया बाप्पासाठी हळव्या,पुण्यातील दगडूशेठ गणपतीशी खास कनेक्शन
रुपयाचं नाणं, किट बॅग अन् सचिनला घडवणारे 3 हात, मास्टरब्लास्टरची भावुक पोस्ट
आधी कमल हासनसोबत केलं काम, नंतर त्यालाच आपल्या इशाऱ्यावर नाचवलं; हा मुलगा कोण!
त्वचेसोबत केसांचेही सूर्यप्रकाशापासून रक्षण आवश्यक! या सोप्या टिप्स करा फॉलो
आणखी पाहा
ताज्या बातम्या
‘माझ्या बायकोसोबत तुझे..’, घरचे गणेश विसर्जनाला जाताच भावाचा रक्तरंजित राडा
iPhone 17 सीरीजच्या किंमतींवरही होणार GST 2.0 चा परिणाम? घ्या जाणून
14 दहशतवादी, 400 किलो RDX, सगळी मुंबई टार्गेटवर; पोलिसांना मिळाली धमकी
बाप्पामुळे पॅचअप! 2 वर्षांआधी डिवोर्स, सेलिब्रेटी कपल पुन्हा एकत्र,रोमँटिक फोटो
आणखी पाहा
advertisement