Public Safety Bill Protest | जनसुरक्षा कायद्याविरोधात उद्या राज्यव्यापी आंदोलन, मुंबईत मोर्चाला परवानगी नाकारली!

एक्स्प्लोर

मुख्यपृष्ठव्हिडीओबातम्यामहाराष्ट्रPublic Safety Bill Protest | जनसुरक्षा कायद्याविरोधात उद्या राज्यव्यापी आंदोलन, मुंबईत मोर्चाला परवानगी नाकारली!

By : abp majha web team  | 10 Sep 2025 12:22 AM (IST)

जनसुरक्षा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडी आणि जनसुरक्षा कायदा विरोधी संघर्ष समिती महाराष्ट्र यांच्या वतीने उद्या राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून उद्या दुपारी चार वाजता मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. शिवाजी पार्क मैदानातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ हा निषेध मोर्चा काढण्याचे नियोजन आहे. मात्र, मुंबई पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे उद्या सकाळपासूनच महाविकास आघाडीच्या नेत्यांची धरपकड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जनसुरक्षा कायद्याला विरोध करण्यासाठी विविध संघटना आणि राजकीय पक्ष एकत्र आले आहेत. या कायद्यामुळे नागरिकांच्या अधिकारांवर गदा येऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. राज्यभरातून या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. मुंबईतील परिस्थिती पाहता, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे.

महाराष्ट्र

Eknath Shinde : जरांगेंना शिंदेंचं कौतुक, फडणवीसांचा राग का? माझाच्या न्यूजरुममध्ये DCM एकनाथ शिंदे

आणखी पाहा

Sponsored Links by Taboola

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा

टेलिग्राम जॉईन करा

 

Author

Leave a Comment