
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्या आगमन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. त्या मिरवणुकीमध्ये गंधाक्ष ढोल पथकांने सुरेख असे वादन करून पुणेकर नागरिकांची मन जिंकली. तर यावेळी क्रांतीवीर चाफेकर बंधू यांनी ब्रिटिश अधिकारी वॉल्टर चार्ल्स रँडचा वध केला होता. त्याघटनेचं सादरीकरण करण्यात आलं.