एक्स्प्लोर
मुख्यपृष्ठव्हिडीओबातम्यामहाराष्ट्रPune Gang War | पुण्यात गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला गँगवॉर, गोविंदा कोमकरची हत्या
By : abp majha web team | 05 Sep 2025 10:38 PM (IST)
पुण्यात गणेश विसर्जनाच्या अगदी पूर्वसंध्येला गँगवॉरची मोठी घटना घडली आहे. नाना पेठेमध्ये गोविंदा कोमकर या तरुणाची तीन गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. गोविंदा कोमकर हा वनराज अंधेकर हत्या प्रकरणातील आरोपी संजीवनी कोमकर हिचा पुतण्या होता. गेल्या वर्षी याच नाना पेठ परिसरात वनराज अंधेकर यांची हत्या झाली होती. या हत्या प्रकरणात मुख्य आरोपी संजीवनी कोमकर सध्या तुरुंगात आहे. तसेच, गोविंदाचे वडील गणेश कोमकर आणि काका जयंत कोमकर हे देखील वनराज अंधेकर हत्या प्रकरणात आरोपी म्हणून तुरुंगात आहेत. आज हत्या झालेला गोविंदा कोमकर आणि गेल्या वर्षी हत्या झालेले वनराज अंधेकर हे दोघे सक्के मामा-भाचे होते. या घटनेमुळे पुण्यात पुन्हा एकदा टोळीयुद्धाची भीती निर्माण झाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
महाराष्ट्र
Eknath Shinde : जरांगेंना शिंदेंचं कौतुक, फडणवीसांचा राग का? माझाच्या न्यूजरुममध्ये DCM एकनाथ शिंदे
आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा