Rahul Gandhi Press Conference : पिक्चर अभी बाकी हैं मेरे दोस्त….. राहुल गांधी अजूनही हायड्रोजन बॉम्ब राखूनच!

राहुल गांधी यांनी देशात मतदार डिलीट करणे मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. असं सांगितलं आजच्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप करत जे लोकं या मतदार डिलीट करणाऱ्यांना पाठिशी घालत आहेत. ते सर्व लोकं देशाच्या लोकशाहीची हत्या करत आहेत असा आरोप केला. दरम्यान, राहुल गांधी पत्रकार परिषद झाल्यावर सांगितलं की हा काही हायड्रोजन बॉम्ब नाहीये. आम्ही त्यावर काम करत आहोत. लवकरच तो टाकू!
राहुल गांधी यांनी कशा प्रकारे पद्धतशीर मतदार डिलीट केले जातात हे सविस्तर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन सादर केल्यानंतर अजून एक खुलासा केला. ते म्हणाले, ‘हा काही हायड्रोजन बॉम्ब नाहीये. तो तयार होत आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर आम्ही तुम्हाला हायड्रोजन बॉम्ब दाखवू त्याच्यावर अजून काम सुरू आहे.’
 

Author

Leave a Comment