Raj Kundra EOW Notice : शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला EOW कडून समन्स, लूक आऊट नोटीसही जारी

एक्स्प्लोर

मुख्यपृष्ठव्हिडीओबातम्यामहाराष्ट्रRaj Kundra EOW Notice : शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला EOW कडून समन्स, लूक आऊट नोटीसही जारी

By : abp majha web team  | 09 Sep 2025 07:42 AM (IST)

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि उद्योगपती राज कुंद्रा यांना साठ पूर्णांक अठ्ठेचाळीस कोटी रुपयांच्या गुंतवणूक फसवणूक प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेनं समन्स बजावलेलं आहे. सुरुवातीला त्यांना दहा सप्टेंबर रोजी तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, कुंद्रा यांनी पंधरा सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ मागितली होती. त्यामुळे आता राज कुंद्रा यांना पंधरा सप्टेंबर रोजी आर्थिक गुन्हे शाखेनं चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे. दरम्यान, राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी या जोडप्याला देश सोडून जाण्यापासून रोखण्यासाठी लुकआऊट सर्क्युलर देखील जारी करण्यात आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण (NCLT) च्या ऑडिटरला देखील या प्रकरणी चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहे. या प्रकरणात अनेक महत्त्वाचे पैलू समोर येत आहेत. आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे.

महाराष्ट्र

Eknath Shinde : जरांगेंना शिंदेंचं कौतुक, फडणवीसांचा राग का? माझाच्या न्यूजरुममध्ये DCM एकनाथ शिंदे

आणखी पाहा

Sponsored Links by Taboola

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा

टेलिग्राम जॉईन करा

 

Author

Leave a Comment