Sambhajinagar Crime : ड्रग्ज तस्करी करणाऱ्या टोळीची महिला पोलिसांनी काढली धिंड

मुख्य पुरवठादार इरफान घोरवडे (रा. नांदेड), सय्यद नजिरोद्दीन सय्यद रियाजोद्दीन (३३, रा. बाबर कॉलनी, हत्तीसिंगपुरा) आणि अमजद खान अन्वर खान (३०, रा. इकबालनगर, नांदेड) या आरोपींचा यात समावेश आहे. एनडीपीएस, गुन्हे शाखा यासह दामिनी पथकातील अधिकारी, महिला अंमलदार यांनी आरोपींची धिंड काढल्याने शहरात चांगलीच चर्चा झाली. यापुढे तरुणाईला नशेच्या दलदलीत लोटणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश पोलिसांनी या कारवाईतून दिला आहे. नागरिकांनीही अमली पदार्थ विक्रेत्यांची नावे असतील तर पोलिसांना द्यावीत. नावे देणार्याचे नाव गोपनीय ठेवू, असे पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांनी आवाहन केले.
 

Author

Leave a Comment