प्रशासनाकडून संबंधितांना नोटीस बजावण्यात आली होती. त्यावर सदर कर्मचार्यांचे खुलासे संबंधित विभागाला प्राप्त झाले आहेत. सामान्य प्रशासन विभागाकडे एका महिला शिपायाचा यात समावेश आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याबाबतची शिफारस सामान्य प्रशासन विभागाकडून मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे करण्यात आली आहे, तर ग्रामपंचायत विभागाकडे तीन ग्रामसेविकांचे खुलासे प्राप्त झाले आहेत. आरोग्य विभागाकडील पाच कर्मचार्यांचे खुलासेही प्राप्त झाले आहेत, हे खुलासे सामान्य प्रशासन विभागाकडे पाठवण्यात आले आहेत. त्यावरही पुढील आठवड्यात कारवाई होण्याची शक्यता आहे.सरकारी सेवेत असतानाही लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी अर्ज केल्याचे आणि योजनेचा लाभ राज्यातील जिल्हा परिषदमधील महिला कर्मचार्यांनी घेतल्याचे निष्पन्न झाले आहे.