Secret Rooms | मीरा रोडच्या ‘Tarzan Dance Bar’ मध्ये गुप्त खोल्या, 17 बारबालांची सुटका!

एक्स्प्लोर

मुख्यपृष्ठव्हिडीओबातम्यामहाराष्ट्रSecret Rooms | मीरा रोडच्या ‘Tarzan Dance Bar’ मध्ये गुप्त खोल्या, 17 बारबालांची सुटका!

By : abp majha web team  | 05 Sep 2025 11:58 PM (IST)

मीरा रोड परिसरातील काशीमिरा पोलिसांनी ‘Tarzan Dance Bar’ वर धाड टाकली. बार माफियाने पोलिसांपासून वाचण्यासाठी बारमध्ये दोन गुप्त खोल्या तयार केल्या होत्या. एका खोलीचा दरवाजा काचेच्या भिंतीमागे लपवला होता, तर दुसरी गुप्त खोली इलेक्ट्रिक बोर्डवरील विशिष्ट प्लग आणि बटन वापरून उघडली जात असे. पोलिसांनी या गुप्त खोल्यांमध्ये दडवलेल्या पाच बारबालांची सुटका केली. बारमध्ये काम करणाऱ्या आणखी बारा बारबालांनाही मुक्त करण्यात आले, अशा एकूण सतरा बारबालांची सुटका झाली. या प्रकरणी बारमालक, मॅनेजर आणि वेटर यांच्यासह एकवीस जणांना अटक करण्यात आली आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, “किचनमध्ये जे इलेक्ट्रिसिटीचा बोर्ड असतो याच्यामध्ये थ्री फिफ्थ चा जो चार्जर आहे तो कनेक्ट केल्यानंतर तो डोअर ओपन होत होता आणि तोही आपल्याला कॅविटी सापडलेली आहे।” या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

महाराष्ट्र

Eknath Shinde : जरांगेंना शिंदेंचं कौतुक, फडणवीसांचा राग का? माझाच्या न्यूजरुममध्ये DCM एकनाथ शिंदे

आणखी पाहा

Sponsored Links by Taboola

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा

टेलिग्राम जॉईन करा

 

Author

Leave a Comment