Shiv Sena Split | दसरा मेळाव्यापूर्वी ‘धमाका’? Uddhav Thackeray गटाचे आमदार Shinde गटाच्या संपर्कात

मुख्यपृष्ठव्हिडीओबातम्यामहाराष्ट्रShiv Sena Split | दसरा मेळाव्यापूर्वी ‘धमाका’? Uddhav Thackeray गटाचे आमदार Shinde गटाच्या संपर्कात

By : abp majha web team  | 09 Sep 2025 11:42 AM (IST)

मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड समोर आली आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार कृपाल तुमाने यांनी एक महत्त्वाचा दावा केला आहे. उद्धव ठाकरे गटातील दोन आमदार वगळता उर्वरित सर्व आमदार शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात आहेत. हे आमदार लवकरच पक्षप्रवेश करणार असल्याचे कृपाल तुमाने यांनी म्हटले आहे. तसेच, बीएमसीमधील उद्धव ठाकरे गटाचे ऐंशी टक्के आमदारही आपल्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. दसरा मेळावा झाल्यानंतर लगेचच पक्षप्रवेशाचा मुहूर्त काढला जाईल, असे कृपाल तुमाने यांनी सांगितले. या संदर्भात बोलताना त्यांनी म्हटले, “त्यांच्या पक्षातले दोन आमदार सोडून उर्वरित सर्व आमदार आमच्या संपर्कात आहेत आणि बीएमसीचे जे आता त्यांचे आमदार आहेत, त्यापैकी ऐंशी टक्के आमदार हे आमच्या संपर्कात आहे। आम्ही दसऱ्या मेळावा आमचा झाला की दसऱ्या मेळावा होताच लगेच आम्ही मुहूर्त काढू त्यांचा आणि सर्वांना पक्षप्रवेश करावा.” संजय राऊत यांनी दसरा मेळाव्यात ‘धमाका’ होणार असल्याचे म्हटले होते, मात्र त्यापूर्वीच कृपाल तुमाने यांनी हा दावा करून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आणले आहे.

महाराष्ट्र

Eknath Shinde : जरांगेंना शिंदेंचं कौतुक, फडणवीसांचा राग का? माझाच्या न्यूजरुममध्ये DCM एकनाथ शिंदे

आणखी पाहा

Sponsored Links by Taboola

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा

टेलिग्राम जॉईन करा

 

Author

Leave a Comment