Solapur Accident : आजीच्या डोळ्यादेखतच पाच वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत; माळशिरस येथील घटना

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, दिलीप शरद माने रा. कुरवली (ता. इंदापूर) हे मोटारसायकल क्रमांक (एम. एच. 45 एक्स 3290) यावरून कुरवलीकडुन निमगांवकडे निघाले होते. त्या बाळाला तहान लागल्याने ते पाणी पिण्यासाठी रस्त्याच्या कडेला थांबले होते. यानंतर ते निघताना काही अंतरावर आल्यानंतर नातेपुतेकडून माळशिरसकडे येणार्‍या चारचाकी कार नंबर (एम. एच. 12 एफ. पी. 9429) या गाडीने भरधाव वेगाने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. यात गाडीवर बसलेल्या अविष हा उंच उडून जागीच मयत झाला. तर त्याची आजी गंभीर जखमी झाली. गंभीर जखमीला अकलूज येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. अविषचा मृत्यू पाहून त्याचे आई-वडील व नातेवाईकांनी हंबरडा फोडला. अपघातानंतर कारचालक गाडी घेऊन पळण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, नागरिकांनी पकडले. रात्री उशीरापर्यंत माळशिरस पोलिस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला नव्हता.
 

Author

Leave a Comment