Solapur Flood | Sina River ला 10 दिवसांत तिसरा पूर, Madha वैराग Road पूल बंद!

एक्स्प्लोर

मुख्यपृष्ठव्हिडीओबातम्यामहाराष्ट्रSolapur Flood | Sina River ला 10 दिवसांत तिसरा पूर, Madha वैराग Road पूल बंद!

By : abp majha web team  | 27 Sep 2025 12:54 PM (IST)

सोलापुरात सीना नदीला दहा दिवसांमध्ये तिसऱ्यांदा पूर आला आहे. १७ सप्टेंबरला पहिला पूर आला होता, त्यानंतर २२ सप्टेंबरला दुसरा आणि आज २७ सप्टेंबरला पुन्हा नदीला पूर आला आहे. माढा वैराग Road वरील पुलावर तीन फूट पाणी आल्याने वाहतुकीसाठी पूल पुन्हा बंद करण्यात आला आहे. एका बाजूला नदीला पूर आणि दुसऱ्या बाजूला जोरदार मुसळधार पाऊस सुरू असल्याने नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. या सततच्या पावसामुळे आणि पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पूरग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

महाराष्ट्र

Omraje Nimbalkar Video : गळ्याएवढ्या पाण्यात बाजी लावली, ‘कोहीनूर’ ओमराजेंचा UNCUT व्हिडीओ

आणखी पाहा

Sponsored Links by Taboola

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा

टेलिग्राम जॉईन करा

 

Author

Leave a Comment