Success Story : पगारदार नोकरापेक्षा पवनचं नाश्ता सेंटर भारी, दिवसाचा गल्ला फक्त 9 हजार रुपये, मेहनतही तशीच!

Success Story : पगारदार नोकरापेक्षा पवनचं नाश्ता सेंटर भारी, दिवसाचा गल्ला फक्त 9 हजार रुपये, मेहनतही तशीच! | Food – News18 मराठी

Trending:

Follow Us

Published by:
local18

Last Updated:September 26, 2025 5:15 PM IST
पवन बोर्डे हे पाच वर्षांपासून भजी-पावसह विविध खाद्यपदार्थांचे नाश्ता सेंटर चालवतात. त्यांच्या नाश्त्याच्या चवीमुळे खवय्ये दुरून त्यांच्याकडे येतात.

छत्रपती संभाजीनगर वाळूज येथील प्रताप चौक परिसरात पवन बोर्डे हे पाच वर्षांपासून भजी-पावसह विविध खाद्यपदार्थांचे नाश्ता सेंटर चालवतात. त्यांच्या नाश्त्याच्या चवीमुळे खवय्ये दुरून त्यांच्याकडे येतात, त्यामुळे नेहमी येथे वर्दळ असते.

advertisement

सकाळी 4 वाजल्यापासून हे नाश्ता सेंटर सुरू होते आणि संध्याकाळी 7 वाजेपर्यंत ग्राहकांना ते खाद्याची सेवा पुरवतात. बोर्डे यांची दिवसाला 8 ते 9 हजार रुपयांची उलाढाल होत असते, तर महिन्याला खर्च वजा निव्वळ नफा 70 ते 80 हजार रुपये मिळत असल्याचे बोर्डे यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.

advertisement

वाळूज येथील एमआयडीसी परिसरातील प्रताप चौकात लोडिंग ऑटो-रिक्षामध्ये किचन बनवून आणि नाश्ता सेंटरसाठी लागणारे सर्व साहित्य या ठिकाणी पाहायला मिळते. या नाश्ता सेंटरमध्ये खिचडी, पोहे, भजी-पाव, समोसे, ब्रेडवडा यासह विविध खाद्यपदार्थ त्यांच्याकडे मिळतात. एमआयडीसी परिसर असल्यामुळे या ठिकाणी नेहमी कामगारांची तसेच रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांची नाश्ता करण्यासाठी वर्दळ असते.

advertisement

विशेषतः बोर्डे हे खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी सर्व मसाले घरी तयार करतात. लसूण अद्रक पेस्ट याबरोबरच लाल मिरच्यांची चटणी यासह विविध मसाले बनवले जातात.

advertisement

या ठिकाणी एक आचारी तसेच दोन कामगार असे एकूण चार जण या ठिकाणी काम करतात आणि रोजगार उपलब्ध झाल्याने ते देखील समाधान व्यक्त करत आहेत. बोर्डे यांच्या नाश्ता सेंटरच्या आर्थिक उलाढालीमुळे आणि प्रगतीमुळे इतर तरुणांना प्रेरणा व मार्गदर्शन मिळत असल्याने ते देखील या व्यवसायात येऊ पाहत आहेत.

advertisement

‘मी वन-नाईट स्टँडसाठी तयार..’, 50 वर्षांची बोल्ड अभिनेत्री असं का म्हणाली?
View All

वाढलेलं वजन कमी करण्यासाठी शेंगदाणे आणि मखाना खाताय? सगळ्यात बेस्ट काय?

नाटक झालं हाऊसफुल्ल! आता रिअल लाइफ कपल मोठा पडदा गाजवणार

श्रीलंकेविरूद्ध सूर्या ‘हुकमी एक्का’ मैदानात उतरवणार,आशिया कपमध्ये एकही सामना खे

मोबाईल नंबरच्या शेवटी हे तीन क्रमांक असणं अनलकी! होता-होता कामं अडकून पडतात

जे मिळवण्यासाठी आलियाला 20 वर्ष लागली, ते राहाने फक्त चौथ्याच वर्षी मिळवलं

आणखी पाहा

Asia Cup 2025 Final विजेत्याला प्राईझ मनी किती मिळणार? बदलणार संपत्तीचा हिशोब

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना घेतले फैलावर

प्रणित मोरेला रंगावरून हिणवलं, निक्की तांबोळीचा चढला पारा, बसीर अलीला झापलं

एमपीएससी उमेदवारांसाठी मोठी बातमी, राज्यसेवा पूर्व परीक्षेची तारीख बदलली

आणखी पाहा
advertisement

 

Author

Leave a Comment