Vice President election: उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सात ते आठ खासदारांनी केले क्रॉस वोटिंग

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत राज्यातील महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाच्या ४ ते ५, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या २ आणि काँग्रेसच्या एका खासदाराने क्रॉस वोटिंग केली. उपराष्ट्रपती पदाच्या निवडीसाठी मंगळवारी मतदान झाले आणि लगेच निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांचा विजय झाला. त्यांना ४५२ मते मिळाली तर इंडिया आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांना ३०० मतांवर समाधान मानावे लागले.
या निवडणुकीत क्रॉस वोटिंग होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. सी. पी. राधाकृष्णन महाराष्ट्राचे राज्यपाल असल्याने राज्यातील महाविकास आघाडीचे खासदार त्यांच्या बाजूने मतदान करतील असा अंदाज लावला जात होता. त्याप्रमाणेच महाविकास आघाडीच्या सात ते आठ खासदारांनी क्रॉस वोटिंग केली. 
 

Author

Leave a Comment