Vice President Election | संजय राऊत पितृपक्षातील कावळा, Bonde यांचा हल्लाबोल

एक्स्प्लोर

मुख्यपृष्ठव्हिडीओबातम्यामहाराष्ट्रVice President Election | संजय राऊत पितृपक्षातील कावळा, Bonde यांचा हल्लाबोल

By : abp majha web team  | 09 Sep 2025 11:46 AM (IST)

भाजप खासदार अनिल बोंडे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. अनिल बोंडे यांनी संजय राऊत यांना पितृपक्षातील कावळा म्हटले आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या निकालानंतर संजय राऊत यांना श्राद्धाचा घास निश्चितच भेटणार असल्याचे बोंडे यांनी म्हटले. इंडिया आघाडीतील खासदार देखील महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतीपदासाठी मतदान करतील असा दावा अनिल बोंडे यांनी केला आहे. मोदींच्या विकसित भारताच्या संकल्पनेवर सर्वजण प्रेम करतात, त्यामुळे इंडिया आघाडीचे खासदारही मनापासून सी. पी. राधाकृष्णन यांना मतदान करतील असे बोंडे म्हणाले. सी. पी. राधाकृष्णन मोठ्या बहुमताने उपराष्ट्रपती म्हणून निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचा गर्व असल्याचेही बोंडे यांनी नमूद केले.

महाराष्ट्र

Eknath Shinde : जरांगेंना शिंदेंचं कौतुक, फडणवीसांचा राग का? माझाच्या न्यूजरुममध्ये DCM एकनाथ शिंदे

आणखी पाहा

Sponsored Links by Taboola

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा

टेलिग्राम जॉईन करा

 

Author

Leave a Comment