Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रात वारं फिरलं, सोलापुरात पुन्हा धो धो कोसळणार, IMD कडून महत्त्वाचं अपडेट | पुणे – News18 मराठी
Trending:
Follow Us
Published by:
Reported by:
Last Updated:October 02, 2025 9:05 AM IST
Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. येत्या 2 दिवसांत पाऊस पुन्हा सक्रीय होण्याची शक्यता असून सोलापुरात हवामानाची विचित्र स्थिती आहे.
सप्टेंबरमध्ये महाराष्ट्रात मुसळधार पावसाने कहर केला. आता ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. आज 2 ऑक्टोबर रोजी विदर्भ आणि मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रासह राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या सरींचा अंदाज आहे. पुणे ते कोल्हापूर जिल्हानिहाय हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर परिसरात बुधवारी 0.2 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यावेळी 28.7 अंश सेल्सिअस कमाल तापमान राहिले. आज विजयादशमीच्या दिवशी पुणे जिल्ह्यासह घाटमाथ्यावर ढगाळ आकाशासह हलक्या पावसाची शक्यता आहे. 48 तासानंतर पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
advertisement
गेल्या 24 तासात सातारा जिल्ह्यातील कमाल तापमान 27.8 अंश सेल्सिअस इतके राहीले. वादळी वाऱ्यासह 0.4 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आज संपूर्ण साताऱ्यासह सातारा घाटमाथ्यावर ढगाळ आकाशासह मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
advertisement
कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारी 3 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आज जिल्ह्यातील कमाल तापमान 25.7 अंशावर राहिल. तर पुढील 24 तासात कोल्हापूरसह घाटमाथ्यावर ढगाळ आकाशासह मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
advertisement
सोलापूर जिल्ह्यात मागील 24 तासात 0.6 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पाऊस कमी होताच तापमानात वाढ झाली आहे. 1 ऑक्टोबर रोजी 31.8 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. आज एक दोन वेळा गडगडाटासह पावसाची शक्यता असून आकाश साधारणपणे ढगाळ राहील. शुक्रवारपासून सोलापुरात पुन्हा पावासाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
advertisement
सांगली जिल्ह्यात मागील 24 तासात तुरळक ठिकाणी 1 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यावेळी कमाल तापमान 28.2 अंश सेल्सिअस इतके राहिले. पुढील 24 तासात जिल्ह्यात अंशत: ढगाळ आकाशासह एक दोन वेळा गडगडाटाची पावसाची शक्यता आईएमडीने व्यक्त केली आहे.
advertisement
पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होऊन पहाटे धुके तर दिवसभर रिमझिम पावसासह कडक ऊन असे मिश्र हवामान झाले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता असून काही ठिकाणी ढगाळ आकाशासह हलक्या पावसाची नोंद होईल.
advertisement
गावात शेण गोळा करुन भरायचा पोट, आता करोडपती; 7 स्टार हॉटेलमध्ये करतो पार्ट्या
View All
6 महिन्यात कमी केलं 25 किलो वजन, जिम अन् डायटशिवाय घरीच बनवू शकता स्लिम फिट बॉडी
तुम्ही वारंवार हॉटेलमध्ये राहता? ‘या’ फ्लोरवरील रूम कधीच घेऊ नका, कारण…
दसऱ्याला 1,52,000 रुपयांवर चांदीचे दर,1 तोळे सोन्यासाठी किती मोजावे लागणार?
Skin Care : चेहऱ्यावर व्हिटॅमिन ई लावल्याने काय होते? वाचून व्हाल शॉक!
वारं फिरलं! दसऱ्याला कोकणच्या हवामानात मोठे बदल, मुंबईकरांसाठी IMD चं अपडेट
आणखी पाहा
‘नाइट लाइफ’ला सरकारचा ग्रीन सिग्नल, हॉटेल, थिएटर 24 तास सुरू, मद्यविक्रीचं काय?
हवामान विभागाच्या अंदाजाने शेतकऱ्यांचे टेन्शन वाढलं, काय काळजी घ्याल?
मेट्रोमुळे रस्त्यांची वाट लागली; महापालिका म्हणतेय काय?
6 महिन्यात कमी केलं 25 किलो वजन, जिम अन् डायटशिवाय घरीच बनवू शकता स्लिम फिट बॉडी
आणखी पाहा
advertisement