Weather Alert: मराठवाड्यात पुन्हा पावसाचं धुमशान, 72 तास महत्त्वाचे, हवामान विभागाचा अलर्ट

Weather Alert: मराठवाड्यात पुन्हा पावसाचं धुमशान, 72 तास महत्त्वाचे, हवामान विभागाचा अलर्ट | छ. संभाजीनगर – News18 मराठी

Trending:

Follow Us

Published by:
Reported by:

Last Updated:October 02, 2025 10:57 AM IST
Marathwada Rain: महाराष्ट्रतील हवामानात सातत्याने बदल जाणवत आहेत. गेल्या 2-3 दिवसांच्या ब्रेकनंतर मराठवाड्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

मागील आठवडाभर महाराष्ट्रभर पावसाने हाहाकार माजवला होता. अनेक ठिकाणी महापुराची स्थिती निर्माण झाली होती. शेतकऱ्यांची पिके पाण्यात बुडून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नद्यांना पूर आला, रस्ते वाहून गेले, आणि जनजीवन विस्कळीत झाले. आता मात्र हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. मराठवाड्यातील आजचा हवामान अंदाज जाणून घेऊ.

advertisement

गेल्या तीन दिवसांपासून मराठवाड्यातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. मुसळधार पावसानंतर आता अनेक जिल्ह्यांत पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. भारतीय हवामान विभागाकडून (IMD) मिळालेल्या माहितीनुसार, आज, 2 ऑक्टोबर रोजी मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत पुन्हा पावसाची शक्यता असून यलो अलर्ट देण्यात आला आहे.

advertisement

विजयादशीच्या दिवशी परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर या चार जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यातील काही भागात ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. प्रशासनाने शेतकऱ्यांना आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून नदी काठावरील गावांना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.

advertisement

मराठवाड्यातील उर्वरित छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना आणि धाराशिव या जिल्ह्यांत ढगाळ हवामान राहील. या ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. मात्र हवामान विभागाकडून कोणताही अलर्ट जारी करण्यात आलेला नाही. त्यामुळे या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

advertisement

दरम्यान, मराठवाड्यात पुढील 3 दिवस पावसाचा जोर वाढणार आहे. 2 ऑक्टोबरला 4 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून 4 ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. या काळात छत्रपती संभाजीनगरसह आठही जिल्ह्यांत पुन्हा पावसाचा यलो अलर्ट असेल. त्यामुळे नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.

advertisement

गावात शेण गोळा करुन भरायचा पोट, आता करोडपती; 7 स्टार हॉटेलमध्ये करतो पार्ट्या
View All

पत्नीच्या नावाने 1 लाख रुपये FD ठेवले तर 2 वर्षांत किती परतावा मिळेल?

झोपताना केस बांधून की सोडून झोपावं? एक सवय ठरू शकते तुमच्या केसांसाठी हेल्दी

दिवाळी स्वच्छ्तेदरम्यान ‘या’ वस्तू काढून टाका! आयुष्यावर करतात नकारात्मक परिणाम

डार्क जीन्स धुताना करू नका ‘या’ 5 चुका; कधीच पडणार नाही जिन्सचा रंग फिका! 

पश्चिम महाराष्ट्रात वारं फिरलं, पुन्हा धो धो कोसळणार, IMD कडून महत्त्वाचं अपडेट

आणखी पाहा

माणूस आहे की कोण? दिवसभर मिरची खातो, अंघोळही मिरचीनेच, प्रायव्हेट पार्टही धुतो

या तारखेपासून धो धो कोसळणार, पंजाबराव डख यांच्याकडून मोठं अपडेट

डोंबिवलीत गरबा खेळताना तरुणावर चॉपरने वार, चौघांनी आधी मित्रांना मारलं मग…

पत्नीच्या नावाने 1 लाख रुपये FD ठेवले तर 2 वर्षांत किती परतावा मिळेल?

आणखी पाहा
advertisement

 

Author

Leave a Comment